शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:27 IST

आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला.

जम्मू - वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून देशभरात त्याविरोधात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच जम्मू काश्मीर विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये झटापट झाली. हा वाद इतका वाढला की दोन्ही पक्षाच्या आमदारांनी फ्री स्टाईल हाणामारीही केली. दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. वक्फ कायद्यावर सभागृहात चर्चेची मागणी सुरू होती.

वक्फ कायद्यावर चर्चा करा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी केली. त्यावर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी विरोध केला. वक्फ कायद्यावर चर्चा करावी यासाठी जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ उडाला आणि त्यावरून सभागृह ३ तास स्थगित करण्यात आले. विधानसभा प्रवेश द्वारावर भाजपा आणि आपचे आमदार एकमेकांना भिडले. या दोन्ही पक्षातील आमदारांमध्ये झटापट झाली. आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला.

या गोंधळावर भाजपा आमदार म्हणाले की, आपचे नेते माध्यमांसमोर बोलताना हिंदूंविरोधात अपमानास्पद भाषेचा वापर करत होते. विधानसभेचे कामकाज पाहायला आलेल्या पीडीपी कार्यकर्त्यांनीही मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणीवरून आप कार्यकर्त्यांशी भिडले असं सांगितले. तर भाजपाच्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला असा आरोप आपचे आमदार मेहराज मलिक यांनी केला. विधानभवन परिसरात या गोंधळामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. 

नेमकं काय घडलं?

विधानसभेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात मेहराज मलिक आणि पीडीपी आमदार वहीद पारा यांच्यात वाद होताना दिसत आहे. तू समाजासोबत गद्दारी केलीय, मेहराज घाबरेल असं तुला वाटते, पण एकालाही सोडणार नाही असं मेहराज मलिक यांनी धमकी दिली त्याशिवाय भाजपा आमदारांनी गुंडगिरी केली असा आरोप मेहराज मलिक यांनी केला. मेहराज मलिक डोडा जागेवरून निवडून आले आहेत ते आम आदमी पक्षाचे एकमेव आमदार आहेत. 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाJammu and Kashmir National Conferenceजम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सJammu Kashmirजम्मू-काश्मीरwaqf board amendment billवक्फ बोर्ड