लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ इतरांवर चिखलफेक करण्याचे स्वातंत्र्य असा होत नाही, असे बजावून सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचा आरोप असलेला ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा सादरकर्ता समय रैनासह पाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले.
हे सर्व आरोपी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जे. बागची यांच्या न्यायपीठाने या सर्वांची उपस्थिती नोंदवली. या सर्वांवर दिव्यांग, स्पायनल मस्क्युलर एट्रोफी व दृष्टिहीन लोकांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे.
मार्गदर्शक तत्त्वे तयार कराअभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतरांचे अधिकार तसेच कर्तव्यांत संतुलन राखण्याच्या दृष्टीने सोशल मीडियासाठी केंद्र सरकारने घटनात्मक निर्देशांनुसार मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना दिले.
काय आहे प्रकरण? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रैना व पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांच्यासह त्यांचा युट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’वर पोलिसांनी अवमानकारक टिपणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. रणवीरला न्यायालयाने फेब्रुवारीत अटकेपासून संरक्षण दिले.