स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत हाणामारी
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:25+5:302015-08-16T23:44:25+5:30
धुळे : अनकवाडी येथे स्वातंत्र्यदिनी जुन्या वादातून ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी झाली त्यात बारा जण जखमी झाले़ जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़

स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत हाणामारी
ध ळे : अनकवाडी येथे स्वातंत्र्यदिनी जुन्या वादातून ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी झाली त्यात बारा जण जखमी झाले़ जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ धुळे तालुका पोलिसांत २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ ग्रामसभेत नंदू गोविंदा खिळे यांनी सरपंच पितांबर चव्हाण यांना मनरेगा कृती आराखड्यात कोणती कामे घेतली आहेत, अशी विचारणा केली़ त्याचा राग येऊन पितांबर चव्हाणसह वीस जणांनी लाठ्याकाठ्यांनी पितांबर खिळे यांच्यासह दीपक खिळे, प्रविण खिळे व विनायक खिळे, शिवाजी खिळे यांना मारहाण केली़ (प्रतिनिधी)