सबळ पुराव्याअभावी दोघांची मुक्तता
By Admin | Updated: March 11, 2016 22:26 IST2016-03-11T22:26:28+5:302016-03-11T22:26:28+5:30
जळगाव : तलवारीने एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ातील दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास फिर्यादी विशाल प्रकाश गारुंगे (रा.जाखनीनगर, कंजरवाडा) यांच्यावर शशिकांत दिलीप बागडे व कपिल दिलीप बागडे यांनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी दोघांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. लव्हेकर यांच्या न्यायालयात चालला. त्यात सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे ॲड.गोडंबे यांनी तर आरोपीतर्फे ॲड.सुनील इंगळे यांनी काम पाहिले.

सबळ पुराव्याअभावी दोघांची मुक्तता
ज गाव : तलवारीने एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ातील दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास फिर्यादी विशाल प्रकाश गारुंगे (रा.जाखनीनगर, कंजरवाडा) यांच्यावर शशिकांत दिलीप बागडे व कपिल दिलीप बागडे यांनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी दोघांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. लव्हेकर यांच्या न्यायालयात चालला. त्यात सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे ॲड.गोडंबे यांनी तर आरोपीतर्फे ॲड.सुनील इंगळे यांनी काम पाहिले.