आता देशातील सर्व रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 10:09 AM2018-07-19T10:09:12+5:302018-07-19T10:12:35+5:30

देशातील ७०७ स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू

free wi fi at all stations without any expenditure on railways said minister | आता देशातील सर्व रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

आता देशातील सर्व रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

Next

नवी दिल्ली : देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लवकरच मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता फ्री वाय-फायचा लाभ घेता येणार आहे. लोकसभेत बुधवारी (18 जुलै) एका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी याबाबत माहिती दिली. 

वर्ष २०१६-१७मध्ये १००, २०१७-१८मध्ये २०० तर २०१८-१९ या वर्षात ५०० स्टेशनांवर वाय-फाय सुविधा पुरवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते, त्यानुसार आतापर्यंत देशातील ७०७ स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र हे करताना  रेल्वेच्या तिजोरीवर याचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असंही गोहेन यांनी सांगितलं.

''रेल-टेलने ए-1 आणि ए श्रेणीतील स्टेशनांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यासाठी मेसर्स महाता इन्फॉर्मेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी मेसर्स गुगल इन्कार्पोरेटेड कंपनीची उपकंपनी आहे. या कंपन्या वाय-फाय सुविधेवरील खर्चाचा भार उचलतील असेही गोहेन यांनी म्हटलं आहे. तसेच बी आणि सी श्रेणीतील स्टेशनांवरील सुविधेसाठीही निधीची तरतूद व्हावी, अशी सूचना रेल-टेलला करण्यात आली. तर डी आणि ई श्रेणीतील स्टेशनांवर या वाय-फाय सुविधेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी दूरसंचार विभागाकडे आग्रह धरण्यात आला आहे," असेही गोहेन यांनी सांगितले.

Web Title: free wi fi at all stations without any expenditure on railways said minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :WiFiवायफाय