रोमनवाडीत मोफत टँकरने पाणी
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:09+5:302016-03-03T01:57:09+5:30
सेवाभावी संस्था व सधन व्यक्तींनी दुष्काळाबाबत गंभीर व्हावे : संजय जगताप

रोमनवाडीत मोफत टँकरने पाणी
स वाभावी संस्था व सधन व्यक्तींनी दुष्काळाबाबत गंभीर व्हावे : संजय जगताप जेजुरी : सामाजातील सेवाभावी संस्था किंवा सधन व्यक्तींनी दुष्काळात सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. दुष्काळाबाबत सर्वांनीच गंभीर झाले पाहिजे. असे प्रतिपादान काँग्रेसचे युवा नेते संजय जगताप यांनी केले आहे. रोमनवाडी- पांडेश्वर (ता.पुरंदर) येथे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने सासवड येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन ग्रुप आणि जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोफत पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे. या उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने सासवड येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन ग्रुप आणि जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोफत पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे. याचा शुभारंभ युवा नेते संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमाचे कौतुक करून दुष्काळ निवारणासाठी शेतकरी बांधवांसाठी पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चार्यासाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी मार्केट कमिटीचे सभापती नंदुकाका जगताप यांनी पुरंदरच्या पूर्व भागात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या भागातील गावांना टंचाई यादीत घेणे गरजेचे असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी पेपरबाजी करून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याची जाहिरात करीत असल्याचा आरोप केला आहे, तर सिद्धिविनायक ग्रुप आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने किरण फडतरे यांनी संजय जगताप यांना प्रेरणास्थान मानून शेतकर्यांप्रती कर्तव्य भावनेतून हा उपक्रम सुरु केल्याचे सांगितले. उपसरपंच पंढरीनाथ सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सागर चव्हाण यांनी स्वागत केले. याप्रसंगी विजय वढणे, नगरसेवक दीपक हिवरकर, सरपंच वैजयंता शिंदे, सदस्या सुषमा रोमण, कल्पना रोमण, पोलीस पाटील अरुण धुमाळ, मनोहर झेंडे, प्रकाश शिंदे, शैलेश रोमण, विक्रम शिंदे, ग्रामसेविका एस. बी. नवले, सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत हिवरकर, दिनेश भिंताडे, संभाजी जगताप, विजय कदम, संजीव देसाई, गणेश सरनाईक, स्वप्नील जगताप यांसह ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. गणेश सोनवणे यांनी आभार मानले. फोटो ई मेल केला आहे फोटोओळी :- रोमणवाडी - पांडेश्वर ( ता. पुरंदर ) येथे सासवड येथील सिद्धिविनायक क न्सट्रक्शन ग्रुप आणि जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पाण्याच्या टँकर सुविधेचा शुभारंभ संजय जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.