प्रभाग १ मध्ये नागरिकांना मोफत टॅँकर

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:12+5:302016-03-03T01:57:12+5:30

नगरसेवक गणेश चव्हाण यांचा उपक्रम

Free Tankers for the citizens in the ward 1 | प्रभाग १ मध्ये नागरिकांना मोफत टॅँकर

प्रभाग १ मध्ये नागरिकांना मोफत टॅँकर

रसेवक गणेश चव्हाण यांचा उपक्रम

पंचवटी : सध्या शहरात पाणी कपात सुरू झाल्याने नागरिकांना दोन ऐवजी एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये देखिल अशीच परिस्थिती असुन नागरीकांची पाण्यावाचून गैरसोय होऊ नये यासाठी प्रभागाचे नगरसेवक गणेेश चव्हाण यांनी स्वखर्चातून पाण्याचा टॅँकर उपलब्ध करून दिला आहे.
सध्या प्रभागात मोफत टॅँकरने पाणी पुरवठा केला जात असुन चव्हाण यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे नागरीकांनी स्वागत केले आहे. प्रभागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरीकांची अनेक दिवसांपासून होती. त्यातच काही दिवसांपासून एकवेळ व अपुर्‍या दाबाने पाणी येत असल्याने नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरीकांची पाण्यावाचून गैरसोय होऊ नये यासाठी प्रभागात सध्या टॅँकरने मोफत पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या प्रभागात दैनंदिन सहा फेर्‍या केल्या जात असुन कलानगर, म्हसरूळ, राजमाता मंगल कार्यालय परिसर, वडजेमळा आदि भागात पाणी पुरविले जात आहे. (वार्ताहर)

इन्फो बॉक्स
मागेल त्याला पाणी देणार
सध्या पाणी कपातीच्या संकटामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी टॅँकरने मोफत पाणी पुरवठा सुरू केला असुन पुढच्या महिन्यात आणखी टॅँकरने पाणी पुरवठा करण्याबरोबरच प्रभागात मागेल त्याला पाणी देणार आहे. आगामी कालावधीत पाण्याची टंचाई आणखी भासण्याची शक्यता असल्याने टॅँकरची संख्या वाढविणार आहे.
गणेश चव्हाण, नगरसेवक मनसे,
टीप-आरफोटोला ०२ पंचवटी टॅँकर नावाने फोटो सेव आहे.

Web Title: Free Tankers for the citizens in the ward 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.