मुंबई मेट्रोच्या दरवाढीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:47+5:302015-08-08T00:23:47+5:30
मेट्रो दरवाढीची कुर्हाड कोसळणारच

मुंबई मेट्रोच्या दरवाढीचा मार्ग मोकळा
म ट्रो दरवाढीची कुर्हाड कोसळणारचनवी दिल्ली : मुंबई मेट्रोचे सध्याचे प्रवासभाडे कायम राखण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दाखल केलेली याचिका सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्याने दरवाढीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची (आरइन्फ्रा) शाखा असलेल्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड(एमएमओपीएल) या कंपनीने वसार्ेव्हा- अंधेरी- घाटकोपर मेट्रोचे कमाल भाडे ४० रुपयांवरून ११० रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर एमएमआरडीएने न्यायालयात धाव घेतली होती. भाडे निर्धारण समितीने अलीकडेच आरइन्फ्राला भाडे १० ते ११० रुपयांदरम्यान ठेवण्याची शिफारस केली होती.