31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क काढा एटीएममधून पैसे !
By Admin | Updated: November 10, 2016 17:21 IST2016-11-10T17:21:54+5:302016-11-10T17:21:54+5:30
आयसीआयसीआयनं 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या ट्रॅन्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क काढा एटीएममधून पैसे !
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून रद्दबातल ठरवल्यानंतर ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. देशातील मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआयनं 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या ट्रॅन्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेचं अनुकरण आणखीही काही बँका करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आतापर्यंत महिन्याभरात एटीएमवर 5 ट्रॅन्झॅक्शन मोफत होते. मात्र आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत कितीही वेळा ट्रॅन्झॅक्शन करता येणार असून, त्यावर कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. काही मुख्य बँकांनी ग्राहकांचा बँकेत येणा-या आवाका पाहता अतिरिक्त काऊंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीआयसीआय बँकेनं ग्राहकांना क्रेडिट कार्डाची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवली आहे. तर डेबिट कार्डावरील दैनंदिन खरेदीवरील सीमा शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बँकांनी ग्राहकांची त्रासातून सुटका होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.