महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही डीटीसीमधून मोफत प्रवास करण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 07:10 PM2019-10-29T19:10:12+5:302019-10-29T19:12:59+5:30

संपूर्ण दिल्लीत महिला प्रवाशांनी योजनेचा लाभ घेतला.

Free bus ride scheme for women begins in Delhi | महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही डीटीसीमधून मोफत प्रवास करण्याचे संकेत

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही डीटीसीमधून मोफत प्रवास करण्याचे संकेत

googlenewsNext

- टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : डीटीसी बसमधून मोफत प्रवास योजनेला दिल्लीकर महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. भाऊबीजपासून ( २९ ऑक्टोबर) संपूर्ण दिल्लीत महिलांसाठी मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. नव्या योजनेचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनादेखील मोफत प्रवास देण्याचे संकेत दिले. केजरीवालांच्या घोषणेमुळे विरोधकांच्या अस्वस्थतेत वाढ झाली आहे. 

बसेसमध्ये महिलांची गर्दी दिसली. पैसे वाचले म्हणून त्या आनंदी दिसल्या. समूहाने प्रवास करणा-या महिलांनी तर 'आज आपले किती पैसे वाचलेत?' याचीही मोजणी केली. महिनाभरात होणा-या बचतीवरही चर्चा बसमध्ये रंगली होती. अनेक महिलांनी 'केजरीवाल सरकार' करीत असलेल्या विविध योजनांची माहिती सोबतच्या प्रवासांना दिली. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोबाईल अ‍ॅपवरील संदेशात 'बहिणींना भावाकडून मोफत प्रवासाची भेट' देत असल्याची भावना व्यक्त केली. ही योजना महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण ठरेल. सार्वजनिक वाहतूक परवडत नसल्याने अनेक मुलींना शाळा-महाविद्यालयातील शिक्षण सोडावे लागते. आता तशी वेळ एकाही विद्यार्थीनीवर येणार नाही. प्रवासावर एता एकही रूपया खर्च होणार नाही. लवकरच राज्य सरकार ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनादेखील मोफत प्रवासाची सवलत देणार असल्याचे सूतोवाच केजरीवालांनी केले.

 
- संपूर्ण दिल्लीत महिला प्रवाशांनी योजनेचा लाभ घेतला. डीटीसी बसमध्ये भाऊबीज व रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते. त्यामुळे अनेक महिलांना आता ही सवलत नेहमी असेल, याची माहिती नसल्याचे दिसले.  ट्विटरवर अनेक तरूणींनी तिकीटासोबत सेल्फी टाकला. फेसबूकवरदेखील अनेकांची 'वॉल' अशा फोटोंनी ओसंडून वाहत होती.   

- केजरीवाल ट्विटमध्ये म्हणाले, आजपासून (भाऊबीज) बसमध्ये महिलांना मोफत प्रवास असेल. महिला सुरक्षा, सबलीकरण व अर्थकारणात महिलांचा सहभाग वाढवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. गुलाबी तिकीट..दिल्ली कुटुंबातील प्रत्येक बहिणीस भाऊबीजेच्या शुभेच्छा. 

- नोएडा व एनसीआरमध्ये महिलांना मोफत प्रवास. विमानतळावरील बस सेवा, क्लस्टर बसेसमध्येही सवलत लागू. राज्य सरकाराच्या सेवेत असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यास प्रवास भत्ता मिळणार नाही.  

- महिलांना गुलाबी तिकीट देण्यात आले.  अरविंद केजरीवालांचे छायाचित्र त्यावर होते. त्यावर संदेश होता- तुम्ही व तुमच्या कुटुंबाची भरभराट होवो, हीच माझी इच्छा. महिला सशक्त झाल्या तरच देशाचा विकास होईल.' 

राजीव गांधी म्हणत असत लोककल्याणासाठी असलेल्या १०० पैकी ८५ रूपयांमध्ये भ्रष्टाचार होतो. लोकांना केवळ १५ रूपये मिळतात. आम्ही (आप सरकार) सामान्य जनतेचे ८५ रूपये वाचवले आहेत.
- अरविंद केजरीवाल.

Web Title: Free bus ride scheme for women begins in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.