शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फ्रॅक्चर डाव्या पायाला, ऑपरेशन केलं उजव्या पायाचं, महिलेच्या नातेवाईकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:03 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधिल सुल्तानपूर येथे एका अस्थिरोगतज्ज्ञाकडून झालेल्या हलगर्जीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे डॉक्टरांनी एका वृद्ध महिलेच्या तुटलेल्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशमधिल सुल्तानपूर येथे एका अस्थिरोगतज्ज्ञाकडून झालेल्या हलगर्जीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे डॉक्टरांनी एका वृद्ध महिलेच्या तुटलेल्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे. ऑपरेशन थिएटरमधून जेव्हा या महिलेला आणण्यात आले तेव्हा तिला पाहून तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. कारण महिलेच्या दुखापतग्रस्त पायाऐवजी दुसऱ्याच पायावर डॉक्ररांनी शस्त्रक्रिया केली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टरांनी फ्रॅक्चर झालेल्या दुसऱ्या पायावर शस्त्रक्रिया केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासन सारवासारव  करण्यात गुंतलं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रतापगड जिल्ह्यातील सिकरी कानूपूर गावातील रहिवासी असलेली भुईला देवी हिच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला चालता फिरता येत नव्हते. त्यामुळे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर नातेवाईकांनी या महिलेला सुल्तानपूर येथील एका रुग्णालयात दाखल केले. तिथे गुरुवारी भुईला देवी हिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा महिलेला बाहेर आणमण्यात आलं तेव्हा तिला पाहून नातेवाईकांना धक्का बसला. भुईला देवी हिचा मुलगा सुरेश प्रजापती याने केलेल्या दाव्यानुसार त्याच्या आईच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालेलं होतं.  मात्र डॉक्टरांनी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर भुईला देवी हिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तसेच तिच्या तुटलेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जीपणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पी. के. पांडेय हे रुग्णालयातून गायब झाले. तर रुग्णालयाकडून घडल्या प्रकाराबाबत सारवासारव केली जात आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, रुग्णाच्या डाव्या पायाच्या हाडालाही दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर तर उजव्या पायामध्ये सूज होती आणि रक्त जमा झालेलं होतं. ते काढण्यात आलं. चुकीचा शस्त्रक्रिया झाल्याचा करण्यात येत असलेला दावा बनावट आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdocterडॉक्टर