शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

मुंबईत नौदलातील चौघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: July 21, 2015 01:03 IST

तिघांना अटक : जूनपासून वारंवार अत्याचार मुंबई : चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीला फूस लावून व भीती दाखवून नौदलातील चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कफ परेड पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जवान प्रशिक्षणासाठी परगावी गेला आहे. जितेंद्रसिंग दारागोकुल वालचंद (२४), पवन ऊर्फ ओमपाल हुशारसिंग (३१), राकेश ...


तिघांना अटक : जूनपासून वारंवार अत्याचार

मुंबई : चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीला फूस लावून व भीती दाखवून नौदलातील चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कफ परेड पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जवान प्रशिक्षणासाठी परगावी गेला आहे. जितेंद्रसिंग दारागोकुल वालचंद (२४), पवन ऊर्फ ओमपाल हुशारसिंग (३१), राकेश प्रसाद सिंग (४१) व पृथ्वी उमेशसिंग चौहान अशी त्यांची नावे आहे. पृथ्वी चौहान प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले. राकेश सिंग हा नौदलात कंत्राटदार आहे. जून महिन्यात त्याने मुलीवर अत्याचार केले.
नौदलाच्या अधिकारी व जवानांसाठी कफ परेड येथे असलेल्या क्वार्टर्समध्ये सर्व आरोपी राहतात. संबंधित शाळकरी मुलीशी जानेवारी महिन्यात पृथ्वीने ओळख करीत परिचय वाढविला. जूनच्या पहिल्या आठवड्यात तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच्याकडून ही माहिती समजल्यावर जितेंद्र सिंगने संबंधित मुलीशी संपर्क साधला, तुझ्या आई-वडिलांना सांगेन अशी धमकी देत त्यानेही तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अशाच प्रकारे पवन व राकेश सिंग यांनी तिला भीती दाखवीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. पवन तिची वारंवार छेडछाड करीत होता. अखेर पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर रविवारी रात्री तिच्या पालकांनी त्याबाबत कफ परेड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. जितेंद्र सिंग व पवनला न्यायालयात हजर केले असता ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. राकेशला सोमवारी अटक करण्यात आली असून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
----------------