शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

चार वर्षानंतर नितीश कुमार यांची भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये 'घरवापसी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 14:19 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संयुक्त जनता दल भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाला आहे.

पाटणा, दि. 19 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. चारवर्षानंतर जदयू एनडीएच्या कळपात दाखल झाला आहे. 

चारवर्षांपूर्वी 2013 मध्ये भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव म्हणून जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी दोन दशकापासूनची भाजपाबरोबरची युती तोडली होती. धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर नितीश यांनी त्यावेळी भाजपाबरोबरची आघाडी तोडली होती.पण मागच्या महिन्यात बिहारच्या राजकारणात नाटयमय घडामोडी घडल्या. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश यांनी काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल महागठबंधनची साथ सोडून पुन्हा भाजपाबरोबर सरकार स्थापन केले.  

आज नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या  बैठकीत भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी नाराज असलेल्या शरद यादव गटातील काही कार्यकर्ते नितीश कुमार यांच्या निवास्थानाबाहेर पोहोचले तिथे त्यांनी एनडीमध्ये सहभागी होण्याचा निषेध करत नितीश यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

बिहारच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस आणि पूरामुळे हाहाकार निर्माण झाला असला तरी, राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. नितीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा निर्णय खूपच घाईघाईत घेतला होता. एवढ्या लवकर महाआघाडी तोडून भाजपाच्या समर्थनानं सरकार बनवण्याच्या निर्णयाचं मी समर्थन करू शकत नाही. 2013ला भाजपाशी युती तुटल्यानंतर शरद यादव यांनी भाजपावर उघड हल्लाबोल केला होता. तर जेडीयूचे खासदार अली अनवर यांनीही अंतरात्म्याचा आवज ऐकून नितीश कुमाराच्या निर्णयाला समर्थन देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. 

मी इंदिरा गांधींचांही सामना केला आहे, आता कोणालाच घाबरत नाहीजेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार