शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर नोंदला बलात्काराचा गुन्हा, पीडित मुलगीही त्याच वयाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 04:09 IST

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत शिकणा-या चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) व भारतीय दंड विधानानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदल्याने शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत शिकणा-या चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) व भारतीय दंड विधानानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदल्याने शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या विद्यार्थ्याने जिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे ती पीडित मुलगीही साडेचार वर्षांची असून त्याच्याच वर्गात शिकणारी आहे. पीडित मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला खरा, पण आरोपीचे एवढे लहान वय बघता या प्रकरणाची कायदेशीर हाताळणी नेमकी कशी करायची, याविषयी ते संभ्रमात पडले आहेत. आम्ही हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत असून कायदेशीर सल्ला घेत आहोत, असे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.पोलिसांनी या विद्यार्थ्याला खरंच अटक केली तर केवळ ‘पॉक्सो’ कायद्याखालचाच नव्हे तर बलात्काराच्या गुन्ह्यातील देशातील तो सर्वात लहान वयाचा आरोपी ठरेल. दंड प्रक्रिया संहितेत सात वर्षांपर्यंतच्या मुलांना गुन्ह्यांच्या बाबतीत विशेष संरक्षण आहे. या प्रकरणात ते कसे व कितपत लागू होते याची पोलीस तपासणी करीत आहेत.मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार गेल्या शुक्रवारी शाळेत घडला. आरोपी विद्यार्थ्याने आधी वर्गात आणि नंतर वॉशरूममध्ये त्याच्यासोबत शिकणाºया या मुलीची पॅन्ट काढून तिच्या गुप्तांगात टोक केलेली शिसपेन्सिल व बोट घुसविले, असा आरोप आहे.>तरतूद भेदभावाचीया प्रकरणाचा विचार करता फौजदारी कायद्यांमधील तरतुदी पुरुष आणि स्त्री यांना भेदभावाची वागणूक देणारी आहे, असे जाणवते. लज्जा हे स्त्रीचे जन्मजात व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे मुलगी वयाने कितीही लहान असली तरी तिचा विनयभंग होतो, असे कायदा मानतो. मुलाच्या बाबतीत मात्र हे लागू नाही. एवढ्या लहान मुलाने ही कृती केली खरी पण ती करताना त्याच्या मनात लैंगिक भावना नव्हती, असा बचाव कायद्यापुढे टिकू शकत नाही.

टॅग्स :MolestationविनयभंगNew Delhiनवी दिल्लीCrimeगुन्हाRapeबलात्कार