शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:42 IST

एका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देएका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी गुंटूर जिल्ह्यातील अदविताक्केलापडूमधील राजीव गृहा कल्प अपार्टमेंटच्या बाजूला ही संपूर्ण घटना घडली आहे.दुकानात जाणाऱ्या चार वर्षीय दुपती प्रेम कुमार या चिमुरड्यावर सहा कुत्र्यांनी हल्ला केला होता.

गुंटूर, दि. 22- भटक्या कुत्र्यांकडून लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलेलं पाहायला मिळतं आहे. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. तेथे एका चार वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी गुंटूर जिल्ह्यातील अदविताक्केलापडूमधील राजीव गृहा कल्प अपार्टमेंटच्या बाजूला ही संपूर्ण घटना घडली आहे. दुकानात जाणाऱ्या चार वर्षीय दुपती प्रेम कुमार या चिमुरड्यावर सहा कुत्र्यांनी हल्ला केला होता. वेफर्स घेण्यासाठी दुकानात जात असताना ही घटना घडली.

चार वर्षीय दुपती प्रेम कुमार दुकानात जात असताना त्याच्या ओरडण्याचा आवाज एका महिलेने ऐकला. काही कुत्रे कुमारवर हल्ला करत असल्याचं त्या महिलेने पाहिलं. त्यावेळी तिने कुत्र्यांवर दगडं मारून त्यांना हकलविण्याचा व त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाहून तेथे असणारी काही लोकही मदतीसाठी धावून आली. तो पण तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात कुमार जबर जखमी झाला होता. त्या कुत्र्यांनी मुलाच्या गळ्यावर व हातावार चावा घेतला होता. त्यामुळे त्याला तेथे जबर जखमा झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर कुमारलाल लगेचच गुंटूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये कुमारचा मृत्यू झाला. कुमारचे आई-वडील, मल्लीस्वारी आणि येसुबाबू रोजंदारी करतात. त्यामुळे ही घटना जेव्हा घडली तेव्हा ते दोघेही घरी नव्हते.शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्याबाबतच्या आवश्यक उपाययोजनांसाठी काम सुरू आहे, असं गुंटूर महापालिकेच्या आयुक्त सी. अनुराधा यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सगळीकडेच घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या घटना याआधी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भिंवडीमध्ये एका मुलाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांनी धीरज यादव या ८ वर्षांच्या मुलाच्या शरीराचे लचके तोडले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. धीरज सकाळी साडेनऊच्या सुमारास सलमान शेख या मित्रासोबत कचऱ्याच्या ठिकाणी काचेच्या गोट्या शोधण्यासाठी पाइपलाइनवरून जात होता. धीरजने १५ फूट दलदलीत उडी मारली, तेव्हा तेथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. हे दृश्य पाहून घाबरलेला सलमान घरी जाऊन बसला. दुपारी साडेअकरा वाजता फेणेभागात राहणारा यंत्रमाग कामगार सबाजित बिंद त्याच पाइपलाइनवरून जेवणासाठी घरी जात असताना लहान मुलावर कुत्रे हल्ला करत असल्याचे दिसले. त्याने खोलीमालक काथोड धुमाळ यांना ही घटना सांगितली. दोघांनी मिळून त्या भटक्या कुत्र्यांना तेथून पळवून लावत धीरजची सुटका केली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाला होता. त्याला इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला.