भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:52 AM2017-09-18T05:52:20+5:302017-09-18T05:52:22+5:30

शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून फेणेपाडा येथे रविवारी सकाळी भटक्या कुत्र्यांनी धीरज यादव या ८ वर्षांच्या मुलाच्या शरीराचे लचके तोडले.

In the wake of dreaded dogs, children's death, anger among citizens | भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप

Next

भिवंडी : शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून फेणेपाडा येथे रविवारी सकाळी भटक्या कुत्र्यांनी धीरज यादव या ८ वर्षांच्या मुलाच्या शरीराचे लचके तोडले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. शहरात ठिकठिकाणी कुत्र्यांची संख्या वाढत असतानाही महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.
धीरज सकाळी साडेनऊच्या सुमारास सलमान शेख या मित्रासोबत कचºयाच्या ठिकाणी काचेच्या गोट्या शोधण्यासाठी पाइपलाइनवरून जात होता. धीरजने १५ फूट दलदलीत उडी मारली, तेव्हा तेथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. हे दृश्य पाहून घाबरलेला सलमान घरी जाऊन बसला. दुपारी साडेअकरा वाजता फेणेभागात राहणारा यंत्रमाग कामगार सबाजित बिंद त्याच पाइपलाइनवरून जेवणासाठी घरी जात असताना लहान मुलावर कुत्रे हल्ला करत असल्याचे दिसले. त्याने खोलीमालक काथोड धुमाळ यांना ही घटना सांगितली. दोघांनी मिळून त्या भटक्या कुत्र्यांना तेथून पळवून लावत धीरजची सुटका केली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाला होता. त्याला इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला.
>पाच वर्षांपासून
नसबंदीच नाही
शहरात ठिकठिकाणी कुत्र्यांची संख्या वाढत असताना महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत पालिकेत नागरिकांनी तक्रारी करूनही पाच वर्षांपासून कुत्र्यांची नसबंदी करण्याबाबत पालिकेने कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

Web Title: In the wake of dreaded dogs, children's death, anger among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.