चौघा अल्पवयीन मुलांनी केला ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: December 21, 2014 14:23 IST2014-12-21T14:23:49+5:302014-12-21T14:23:49+5:30
कर्नाटकमध्ये चौघा अल्पवयीन मुलांनी अवघ्या सात वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

चौघा अल्पवयीन मुलांनी केला ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २१ - कर्नाटकमध्ये चौघा अल्पवयीन मुलांनी अवघ्या सात वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा मुलांना ताब्यात घेतले असून पिडीत मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुलबर्गामधील चितपूर गावात राहणा-या सात वर्षाच्या चिमूरडीवर गावातील चौघा अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. नराधम मुलांपैकी एक जण पिडीत मुलीचा नातेवाईक असून उर्वरित तिघे जण त्याचे मित्र आहेत. शुक्रवारी संध्याकाळी हा अमानूष प्रकार घडला होता. शनिवारी रात्री उशीरा मुलीच्या आईवडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पिडीत मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी चौघा मुलांना ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले. मुलीची वैद्यकिय चाचणी सुरु आहे.