चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार: नराधम दोषी
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:30+5:302015-02-15T22:36:30+5:30
नवी दिल्ली : एका चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमास येथील एका न्यायालयाने रविवारी दोषी ठरवले़ राजू अन्सारी असे या नराधमाचे नाव आहे़

चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार: नराधम दोषी
न ी दिल्ली : एका चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमास येथील एका न्यायालयाने रविवारी दोषी ठरवले़ राजू अन्सारी असे या नराधमाचे नाव आहे़ पीडिता आणि तिच्या आईने दिलेल्या साक्षीच्या आधारावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश विकास ढल यांनी आरोपीला दोषी ठरवले़ पीडिता आणि तिच्या आईच्या साक्षीवरून अन्सारीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे सिद्ध होते़ त्यामुळे आरोपीला बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याच्या कलम १०(अधिक गंभीर लैंगिक गुन्हा)अंतर्गत दोषी ठरविण्यात येते, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़पेशाने वेल्डर असलेल्या अन्सारीने ४ फेबु्रवारी २०१३ रोजी चिमुकलीवर अत्याचार केला होता़ तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक घावून गेले होते आणि त्यांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केले होते़