छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवादी ठार

By Admin | Updated: November 22, 2015 18:53 IST2015-11-22T11:25:53+5:302015-11-22T18:53:14+5:30

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या.

Four women Naxalites killed in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवादी ठार

ऑनलाइन लोकमत

सुकमा, दि. २२ - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील अर्णपूर भागात स्पेशल टास्क फोर्स व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या. 
या कारवाईनंतर सुरक्षा रक्षकांकडून परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत असून नक्षलवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

 

Web Title: Four women Naxalites killed in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.