चार दहशतवाद्यांचा आसाममध्ये खात्मा
By Admin | Updated: February 17, 2016 02:56 IST2016-02-17T02:56:08+5:302016-02-17T02:56:08+5:30
आसाममध्ये मंगळवारी लष्कराच्या शोध मोहिमेदरम्यान उडालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

चार दहशतवाद्यांचा आसाममध्ये खात्मा
कोलकाता : आसाममध्ये मंगळवारी लष्कराच्या शोध मोहिमेदरम्यान उडालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लष्कराने पहाटे अरुणाचल प्रदेश व आसामच्या सीमावर्ती भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. यावेळी लोहित जिल्ह्णात उडालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांना ठार करण्यात आले. यातील तीन एनएससीएन (के) चे तर एक उल्फा बंडखोर असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. (वृत्तसंस्था)