शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीत उडी अन्...; एकाला वाचवताना ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 12:38 IST

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीवर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली.

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीवर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली. येथे चार मुलांनी शाळेजवळील नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कर्नाटकातील मंगळुरू परिसरात घडली. विशेष बाब म्हणजे अनेक दिवसांनंतर ही बाब उघडकीस आली. स्थानिक पोलिसांनी पाण्यावर तरंगत असलेले मृतदेह ताब्यात घेतले आहेत. 

मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून यशवित चंद्रकांत, निरूप, अनवित आणि राघवेंद्र अशी त्यांची नावं आहेत. या सर्वांचं वय १५ ते १६ वर्ष आहे. स्थानिक सुरतकल पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. मृत विद्यार्थी एसएसएलसीची प्राथमिक परीक्षा दिल्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 

एकाला वाचवताना चौघांचा मृत्यू परीक्षा संपल्यानंतर हे विद्यार्थी परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी नदीत पोहायला गेले होते, मात्र ते सर्वजण नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना असा संशय आहे की, विद्यार्थ्यांनी पोहण्यासाठी नदी गाठली पण आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. एका विद्यार्थ्याचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य तीन जणही बुडाले असावेत, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी सुरतकल येथील खासगी शाळेत शिकत होते. परीक्षा देऊन शाळेच्या आवारातून बाहेर पडलेले हे चार विद्यार्थी आपापल्या घरी न परतल्याने त्यांच्या चिंतेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानंतर शोध सुरू असताना हेलियांगडीजवळील नदीत चार विद्यार्थ्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकDeathमृत्यूSchoolशाळा