लडाखमध्ये हिमकडा कोसळून चार जवानांचा मृत्यू
By Admin | Updated: January 4, 2016 16:16 IST2016-01-04T16:00:56+5:302016-01-04T16:16:44+5:30
जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात गस्तीवर असणा-या जवानांवर हिमकडा कोसळला.

लडाखमध्ये हिमकडा कोसळून चार जवानांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ४ - जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात गस्तीवर असणा-या जवानांवर हिमकडा कोसळला. या दुर्घटनेत चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली. रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
लडाख भागात जवान गस्त घालत असताना दक्षिण ग्लेशियर येथे बर्फाच्छादीत हिमकडा जवानांच्या अंगावर कोसळला. त्यात चार जवानांचा मृत्यू झाला अशी माहिती उधमपूरस्थित संरक्षण दलाचे प्रवक्ते एस.डी.गोस्वामी यांनी दिली.
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले पण चौघा जवानांचे प्राण वाचवता आले नाहीत. या चारही जवानांचे मृतदेह हंडर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.