खेमकरणमध्ये बीएसएफच्या गोळीबारात चार तस्कर ठार
By Admin | Updated: February 7, 2016 10:46 IST2016-02-07T10:37:20+5:302016-02-07T10:46:34+5:30
पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर खेमकरण गावामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले.

खेमकरणमध्ये बीएसएफच्या गोळीबारात चार तस्कर ठार
ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. ७ - पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर खेमकरण गावामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले. या चार तस्करांमध्ये दोन पाकिस्तानी नागरीक असून, त्यांच्याकडून हेरॉईनची १० पाकिटे जप्त करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण पाच तस्कर होते. त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांना हे तस्कर बेकायदरित्या भारताच्या हद्दीत प्रवेश करत असल्याचे आढळले. त्यांनी तस्करांना शरण येण्याचे आवाहन केले.
पण त्यांनी बीएसएफच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात हे चार तस्कर ठार झाले. ठार झालेल्या चार तस्करांमध्ये दोन पाकिस्तान तर, दोन भारतीय नागरीक आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हॅरोईनची किंमत बाजारात कोटयावधी रुपये आहे.