दरोडयाच्या तयारीतील टोळ्क्यापैकी चारजणांना अटक
By Admin | Updated: March 19, 2015 22:36 IST2015-03-19T22:36:17+5:302015-03-19T22:36:17+5:30

दरोडयाच्या तयारीतील टोळ्क्यापैकी चारजणांना अटक
>पुणे : कात्रजमधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळ्क्यापैकी चारजणांना पोलिसांनी अटक केली. चार महिन्यांपुर्वी त्यांनी याच परिसरात किराणा दुकानदाराच्या डोळ्यांत तिखट टाकून त्यास लुटले होते. अर्जुन जगत चौधरी (वय २७ काळेवाडी), अविनाश धनाजी शिंदे (वय २७ सुंदरनगर)) महेश मधुकर पांडव (वय १९ संतोषनगर, कात्रज )प्रदीप राजदीप चौधरी (वय २४ काळेवाडी)अशी आरोपींची नावे आहेत. अक्षय चौधरी, नितीन पालखे आणि उल्हास अशी नावे असलेले त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. मंगळवारी रात्री दिडच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीवर असताना आंबेगाव रस्त्यावर सातजणांचे टोळ्के मोटरसायकलवर संशयास्पद अवस्थेत दिसून आले. अचानक छापा घातल्यावर चारजण ताब्यात आले. या टोळक्याने लूट, दरोडे असे गुन्हे केले असावेत असा पोलिसांचा संशय आहे.