शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील भाजपचे आणखी चार आमदार बंडखोरीच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 03:15 IST

कम्प्युटर बाबांनी केला दावा

भोपाळ : मध्यप्रदेशातील भाजपच्या दोन आमदारांनी विधानसभेत काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केल्याने भाजपमध्ये खळबळ माजली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप श्रेष्ठींनी ताबडतोब दिल्लीत असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष खा. राकेश सिंह यांना भोपाळला पाठवले. त्यांनी संबंधितांची भेट घेऊ न भाजपचे सारे आमदार एकत्र असल्याचा दावा केला; पण भाजपचे आणखी चार आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नारायण त्रिपाठी व शरद कौल या दोन आमदारांनी बुधवारी सरकारच्या बाजूने मतदान केले. नारायण त्रिपाठी यांनी तर काँग्रेसमध्ये जाण्याचा आपण विचार करीत असल्याचे जाहीर केले. आपली भाजपमध्ये घुसमट होत असल्याचे या दोन आमदारांनी म्हटले आहे. हे दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्याशिवायही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि आमदार झालेले काही जण आहेत. त्यांच्यापैकी आणखी चार जण काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसशी जवळीक असलेल्या कम्प्युटर बाबांनी गुरुवारी जाहीर केले की भाजपमधील चार आमदार आपणास भेटले आहेत आणि ते काँग्रेसकडे पुन्हा येऊ इच्छितात. मुख्यमंत्री कमलनाथ सांगतील, तेव्हा त्या चौघांना आपण त्यांच्याकडे नेणार आहोत.

भाजपमध्ये एकजूट कायम असून कोणतीही गटबाजी अस्तित्वात नाही असे प्रदेशाध्यक्ष खा. राकेशसिंह म्हणाले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये भाजपत कोणतीही गटबाजी नाही. आता सर्व परिस्थिती नियंत्रणात असून काहीही विपरीत घडलेले नाही. सूत्रांनी सांगितले की, नारायण यादव व शरद कौल या दोन आमदारांच्या भाजप नेते संपर्कात आहेत. 

योग्य दखल घेत नसल्याची तक्रारआमची भाजपमध्ये दखल घेतली जात नसल्याची तक्रार दोन आमदारांनी शिवराजसिंह चौहान यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. यापुढे तसे होणार नाही, असे आश्वासन त्यांना शिवराजसिंह चौहान यांनी दिले होते. मात्र, तरीही कमलनाथ सरकारने विधानसभेत मांडलेल्या मध्यप्रदेश फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयकावर या दोन भाजप आमदारांनी बुधवारी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस