जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 15:29 IST2016-05-27T12:40:01+5:302016-05-27T15:29:37+5:30
म्मू-काश्मीरमधील नौगाव येथे दहशतवादी व सुरक्षा दलाचे जवान यांच्यादरम्यान झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून एक जवान शहीद झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २७ - जम्मू-काश्मीरमधील नौगाव येथे दहशतवादी व सुरक्षा दलाचे जवान यांच्यादरम्यान झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून एक जवान शहीद झाला आहे.
काश्मीरमधील नौगाव येथे दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे लष्कराने आज सकाळी परिसरात नाकाबंदी करून शोधमोहिम राबवली. त्यावेळी दहशवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला असता जवानांनी त्यांना प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना ठार मारले, मात्र त्यात एक जवान मृत्यूमुखी पडला. तर दोन जवान जखमी झाले.