शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

अब की बार, चहुबाजूंनी अडकलं मोदी सरकार, SC, EC चे चार मोठे धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:59 IST

लोकसभा निवडणुकीला पहिल्या मतदानाला अवघे 24 तास बाकी असताना भाजपाला एकापाठोपाठ एक जोरदार झटके बसले आहेत.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीला पहिल्या मतदानाला अवघे 24 तास बाकी असताना भाजपाला एकापाठोपाठ एक जोरदार झटके बसले आहेत. भारतीय जनता पार्टीला आणि केंद्र सरकारला दिवसभरात चार झटके बसलेत. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून भाजपाविरोधात निर्णय घेण्यात आलेत. नमो टीव्ही, दूरदर्शनवर मै भी चौकीदार कार्य़क्रम आणि मध्य प्रदेशातील छापेमारी तसेच सुप्रीम कोर्टाकडून राफेल मुद्द्यांवर सरकारला झटका बसला आहे. 

1) राफेल मुद्द्यांवरुन सुप्रीम कोर्टाचा निर्णयराफेल विमान खरेदी प्रकरणाच्या कथित घोटाळ्यावरुन काँग्रेसकडून भाजपाला घेरण्यात येत आहे. राफेल प्रकरणावर सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये दैनिकांत छापून आलेल्या काही पुराव्याआधारे ही याचिका दाखल करण्यात आली होती. राफेल प्रकरणात जी कागदपत्रे गहाळ झाली होती ती ग्राह्य धरली जाणार असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीवेळी केला आहे. 

2) नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाची करडी नजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर सुरु केलेल्या नमो टीव्हीबाबत निवडणूक आयोगाने सक्त पावलं उचलली आहेत. नमो टीव्हीवर ही राजकीय प्रचारासाठी वापरला जात असून यावर भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचार खर्चात ही रक्कम दाखवणं बंधनकारक राहणार आहे. त्याचसोबत नमो चॅनेलवर दाखविण्यात येणाऱ्या राजकीय जाहीराती प्रदर्शित करण्याआधी आयोगाकडून परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने नमो टीव्ही चॅनेल प्रसारणाची कोणतीही परवानगी न घेता सुरु करण्यात आली आहे असा आरोप भाजपावर केला आहे. 

3) दूरदर्शनला निवडणूक आयोगाची नोटीस सरकारी चॅनेल दूरदर्शनला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. 31 मार्चरोजी भारतीय जनता पार्टीचे मै भी चौकीदार हा कार्यक्रम दूरदर्शनकडून लाईव्ह दाखविण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस पाठवली आहे. सरकारी चॅनेलवर सर्व राजकीय पक्षांना समान वेळ द्यावी असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. दूरदर्शनवर मै भी चौकीदार कार्यक्रमाचे प्रसारण जवळपास 85 मिनिटे लाईव्ह दाखविण्यात आलं त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत दूरदर्शनला उत्तर देण्याचे आदेश दिलेत. 

4) छापेमारी करण्याअगोदर परवानगी घ्यावीगेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या जवळीक असणाऱ्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. निवडणुकीत भाजपाने हा प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने चौकशी करणाऱ्या विभागांना धाड टाकण्याआधी आमची परवानगी घ्या असं बजावलं आहे. मध्य प्रदेशात धाड टाकण्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली नव्हती. सरकार राजकीय स्वार्थासाठी स्वायत्त संस्थांचा वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील