राजधानी एक्स्प्रेस घसरून चार ठार
By Admin | Updated: June 26, 2014 02:48 IST2014-06-26T02:48:10+5:302014-06-26T02:48:10+5:30
छपरा-गोल्डनगंज स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला,

राजधानी एक्स्प्रेस घसरून चार ठार
>नवी दिल्ली : बिहारच्या सारण जिल्ह्यात छपरा-गोल्डनगंज स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अन्य 23 जण जखमी झाल़े 13 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळत़े
रेल्वेने पूर्व सर्कलच्या रेल्वे सुरक्षा आयुक्ताद्वारे या घटनेच्या चौकशीचे
आदेश दिले आहेत़ अपघातामागे नक्षल्यांचा हात असल्यावरून रेल्वे
प्रशासन व बिहार सरकारने परस्परविरोधी दावे केले आहेत. रेल्वेने नक्षली घातपाताची शक्यता वर्तवली असतानाच बिहार सरकारने मात्र त्याचा इन्कार केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी आदींनी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आह़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)