कुख्यात गुन्हेगारांसह चार गजाआड
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:55+5:302015-01-23T01:05:55+5:30
गुन्हेशाखेची कामगिरी : साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

कुख्यात गुन्हेगारांसह चार गजाआड
ग न्हेशाखेची कामगिरी : साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना अटक केली. यात एका कुख्यात गुन्हेगाराचाही समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.लकडगंज आणि तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काँक्रिट मशिनसह अन्य साहित्य चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्हेशाखेच्या पथकाने भीमबली घनाराम जांगडे (वय २२, रा. मिनीमातानगर) याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेल्या मशिन आणि अन्य साहित्यांसह ४ लाख, २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुख्यात गुन्हेगार आसिफ इसराईल अंसारी (वय २२, रा. उमरेड रोड) याला अटक करून ॲक्टिव्हा तसेच सीडीडॉन मोटरसायकल जप्त केली. पाचपावली आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या होत्या. सागर राजेश श्रीवास (वय २२, रा. जयरामनगर, यवतमाळ) तसेच विशाल विजयराव देवगडे (वय १९, रा. महाल) या दोघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, दोन मोबाईल हॅण्डसेट तसेच अन्य चीजवस्तूंसह ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हेशाखेचे पोलीश निरीक्षक अविनाश शिळीमकर, एस.एम.गायकवाड, सी.पी. ढोले, एपीआय अतुलकर, दिनेश दहातोंडे, पीएसआय के.आर. सिंग, हवालदार मिलिंद मून, संजय देवकर, नायक गोपाल देशमुख, सतीश निमजे, रामकैलास यादव, अमित भुरे, बादल मांढरे आणि सुनील वानखेडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.----