पेटंट सॉफ्टवेअर विकून चार कोटींची फसवणूक
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:38+5:302015-01-22T00:07:38+5:30
पुणे : महिलेच्या नावाने पेटंट असलेल्या सॉफ्टवेअरची बेकायदेशीरपणे मेडीकल वितरक आणि विक्रेत्यांना विक्री करुन चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकाच कंपनीचे संचालक असलेल्या महिलेने अन्य संचालकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पेटंट सॉफ्टवेअर विकून चार कोटींची फसवणूक
प णे : महिलेच्या नावाने पेटंट असलेल्या सॉफ्टवेअरची बेकायदेशीरपणे मेडीकल वितरक आणि विक्रेत्यांना विक्री करुन चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकाच कंपनीचे संचालक असलेल्या महिलेने अन्य संचालकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अनिल पोपट बेलकर (रा. ९९८, वेणु मित्रमंडळ सोसायटी) यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिल्पा शर्मा (वय ६०, रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी बेलकर आणि शर्मा हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तसेच ते दवा इन्फोटेक या सदाशिव पेठेतील कंपनीचे संचालक आहेत. मेडीकल दुकानांसाठी तसेच व्यावसायिकांसाठी शर्मा यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले होते. हे सॉफ्टवेअर त्यांच्या नावाने पेटंट करण्यात आलेले आहे. या सॉफ्टवेअरची बेलकर आणि त्यांच्या साथीदारांनी मेडीकल वितरक व विक्रेत्यांना विकले. त्यातून अंदाजे चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद शर्मा यांनी दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.