शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:57 IST

विमानसेवा क्षेत्रातील या कंपन्यांची कारवाई नियमानुसार असल्याचे नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात त्रस्त केल्याबद्दल आणखी दोन कंपन्यांनी विनोदी अभिनेता कुणाल कामरा याच्यावर पुढील सूचनेपर्यंत हवाई प्रवास बंदी घातली आहे. मंगळवारी इंडिगो कंपनीने कामरावर सहा महिन्यांसाठी हवाई प्रवास बंदी घातली, तर एअर इंडियाने पुढील सूचनेपर्यंत बंदी घातली आहे. दरम्यान, विमानसेवा क्षेत्रातील या कंपन्यांची कारवाई नियमानुसार असल्याचे नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पष्ट केले आहे.बुधवारी स्पाईस जेट आणि गोएअर या कंपन्यांनी कुणाल कामरावर पुढील सूचनेपर्यंत हवाई प्रवासासाठी बंदी घातली. एअर एशिया इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीची अंतर्गत समिती या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर कारवाई करील. विस्तारा या कंपनीनेही असे निवेदन जारी केले.दरम्यान, डीजीसीएने स्पष्ट केले की, विमानसेवा क्षेत्रातील चार कंपन्यांची कामरावर घातलेली बंदी नियमानुसार आहे. उपद्रवी किंवा हानिकारक प्रवाशांसाठीच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या २०१७ च्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाने शाब्दिक हल्ला केल्यास, त्याच्यावर विमानसेवा क्षेत्रातील कंपनी अंतर्गत समितीचा निर्णय होईपर्यंत बंदी घालू शकते. तथापि, नियमानुसार शाब्दिक हल्ल्याच्या प्रकरणात अंतर्गत समिती तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ संबंधित प्रवाशांवर बंदी घालू शकत नाही. इंडिगोने बंदीचा निर्णय घेतल्यानंतर नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, या घटनेची दखल घेऊन इतर कंपन्यांनाही कामरावर बंदी घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाIndigoइंडिगो