शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

चार मुलं, कोट्यवधींची संपत्ती, तरीही वृद्धाश्रमात… डोळ्यात अश्रू आणेल ८७ वर्षीय आईची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 09:11 IST

एकेकाळी कोट्यधीशांमध्ये गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील ८७ वर्षीय महिलेला आज वृद्धाश्रमात राहावं लागत आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकेकाळी कोट्यधीशांमध्ये गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील ८७ वर्षीय महिलेला आज वृद्धाश्रमात राहावं लागत आहे. महिलेला चार मुलगे असून चौघांचीही कोट्यवधींची मालमत्ता आहे. असं असतानाही अनेक महिने या वृद्ध महिलेला दारोदार चकरा माराव्या लागत होत्या. त्या आईला त्यांची मुलं आणि सून सोबत ठेवायला तयार नाहीत.

विद्या देवी असं या वृद्ध महिलेचे नाव असून, आग्रा येथील प्रख्यात नेत्र रुग्णालयाचे संस्थापक गोपीचंद अग्रवाल यांच्या त्या पत्नी आहेत. गोपीचंद यांची गणना शहरातील कोट्यधीशांमध्ये होते. विद्या देवी आपल्या चार मुलांसह आलिशान घरात राहत होत्या. त्यांनी चारही मुलांना पायावर उभं करून सर्वांचं लग्न लावून दिले. १३ वर्षांपूर्वी गोपीचंद अग्रवाल यांचं निधन झालं आणि हळूहळू विद्या देवी याचं आयुष्यही बदलू लागले. मुलांनी मालमत्ता वाटून घेतली पण वृद्ध आईला काहीच मिळालं नाही.

घरातून काढलंविद्या देवी काही दिवस मोठ्या मुलाकडे राहिल्या, पण त्यांना सतत सूनेचे टोमणे ऐकावे लागत होते. त्यामुळे त्या आपल्या दुसऱ्या मुलासोबत राहू लागल्या. त्यानंतर ती तिसऱ्या आणि चौथ्या मुलासोबत राहू लागल्या. काहींनी कपड्याला दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं तर काहींनी ते यमुनेत फेकून देण्याचं सांगितलं. यानंतरही विद्या देवी घराबाहेर पडल्या नाहीत, तेव्हा मुलानं वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढलं.

वृद्धाश्रमात राहण्यास भाग पाडलंविद्यादेवी यांचे नातेवाईक अग्रवाल महिला मंचच्या अध्यक्षा शशी गोयल यांना ही बाब समजताच त्यांनी विद्यादेवीच्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी शशी गोयल यांनी विद्या देवी यांना रामलाल वृद्धाश्रमात आणलं. आता विद्या देवी वृद्धाश्रमात राहत आहेत. आश्रमातील वृद्ध विद्यादेवींची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे आश्रम व्यवस्थापकानं सांगितलं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश