शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खेळता खेळता चार चिमुकले कारमध्ये अडकले; संध्याकाळी चौघांचे मृतदेह आढळले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 17:20 IST

कारमध्ये अडकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Gujarat News : गुजरातच्या अमरेलीमध्ये हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कारमध्ये अडकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. अमरेलीतील रंधिया गावात रविवारी(दि.3) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. अमरेलीचे पोलीस उपायुक्त चिराग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दुर्घटनेच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या दुर्घटनेचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुले अचानक गाडीत लॉक झालीचिराग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे पालक मध्य प्रदेशातील शेतमजूर असून, कामासाठी गुजरातमध्ये राहतात. रविवारी भरत मंदानी हा शेतमालक मुलांच्या पालकांना सोबत घेऊन शेतात कामाला गेला. शेतात जात असताना भरत मंदानी यांनी त्यांची कार शेतमजूरांच्या घराबाहेर उभी केली होती. आई-वडील आणि शेतमालक निघून गेल्यावर सर्व मुले गाडीत घुसली आणि खेळू लागली. यादरम्यान अचानक कारचा दरवाजा बंद झाला आणि गेट लॉक झाले. मुलांना गेट कसे उघडायचे किंवा काच खाली कशी करायची, याची माहिती नव्हती.

गाडीतून बाहेर येण्यासाठी मुलांनी खूप धडपड केलीकाही वेळातच गाडीच्या आत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि त्यामुळे मुलांचा गुदमरायला लागला. मुलांनी गाडीतून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण बाहेरून कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. वेळेत मदत न मिळाल्याने या मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला. सायंकाळी कार मालक व या मुलांचे पालक शेतातून घरी परतले असता कारमध्ये मुलांचे मृतदेह आढळून आले. या चार मुलांचे वय दोन ते सात वर्षांच्या दरम्यान आहे. 

पोलिसांचा तपास सुरूया प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपासानंतर मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हे प्रकरण अपघाती आहे, मात्र या घटनेमागचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :GujaratगुजरातDeathमृत्यूPoliceपोलिसcarकार