क्रिकेटवर सा घेणार्या चौघांना अटक
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:58+5:302015-02-15T22:36:58+5:30
अमळनेरात छापा : एलसीबीची कारवाई

क्रिकेटवर सा घेणार्या चौघांना अटक
अ ळनेरात छापा : एलसीबीची कारवाईअमळनेर (जि. जळगाव) : भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर भ्रमणध्वनीद्वारे पैशांची बोली लावून सा-जुगार खेळणार्या चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच त्यांच्याकडून ८४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. रविवार दुपारी महेश गेस्ट हाऊवर छापा टाकून एलसीबी पथकाने ही कारवाई केली.आरोपींजवळून लॅपटॉप, एलसीडी टीव्ही, आठ मोबाइल, एक पेन ड्राईव्ह, एक व्हॉईस रेकॉर्डर, दोन कॅलक्युलेटर, सेट टॉप बॉक्स असा एकूण ८३ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. खेमचंद रावलाणी (५१,नाशिक), अजित ठाकूर (४८, नाशिक), अनुप शर्मा (४३, राजस्थान), राजेंद्र पाटील (३१, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.