स्मृती इराणींच्या ताफ्याचा पाठलाग करणा-या चौघांना अटक

By Admin | Updated: April 1, 2017 20:46 IST2017-04-01T20:38:02+5:302017-04-01T20:46:14+5:30

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या वाहन ताफ्याचा पाठलाग केल्या प्रकरणी पोलिसांनी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

The four arrested for firing on Smriti Irani's fir | स्मृती इराणींच्या ताफ्याचा पाठलाग करणा-या चौघांना अटक

स्मृती इराणींच्या ताफ्याचा पाठलाग करणा-या चौघांना अटक

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या वाहन ताफ्याचा पाठलाग केल्या प्रकरणी पोलिसांनी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. या विद्यार्थ्यांची दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे.  
 
स्वत: स्मृती इराणींनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. ही मुले ज्या गाडीत बसली होती ती गाडी आपल्या वाहन ताफ्याचा पाठलाग करुन ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती असे स्मृती इराणींनी तक्रारीत म्हटले आहे. 

Web Title: The four arrested for firing on Smriti Irani's fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.