पश्चिम बंगालमध्ये माजी क्रिकेटपटूने केला 'द्रौपदी'चा पराभव
By Admin | Updated: May 19, 2016 14:56 IST2016-05-19T14:46:33+5:302016-05-19T14:56:38+5:30
पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या रुपा गांगुली यांचा पराभव झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये माजी क्रिकेटपटूने केला 'द्रौपदी'चा पराभव
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या रुपा गांगुली यांचा पराभव झाला आहे. क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाने त्यांचा ३८५०१ मतांनी पराभव केला.
लक्ष्मी रतन शुक्लाला ६१९१७ तर, रुपा गांगुली यांना ३१४१६ मते मिळाली. रुपा गांगुली या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री असून, सर्वसामान्य त्यांना द्रौपदी म्हणून ओळखतात.
१९८८-८९ साली दूरदर्शनवर लागणा-या बीआर चोप्रा दिग्दर्शित 'महाभारत' मालिकेतील त्यांचे द्रौपदीचे पात्र गाजले होते. त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पश्चिम बंगालमधील माध्यमांमध्ये चर्चेत असलेली ही लढत होती. लक्ष्मीरतन शुक्ला भारताचा माजी क्रिकेटपटू असून, रणजीमध्ये बंगाल क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करतो. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळला आहे.