शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 07:24 IST

वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

ठळक मुद्देकर्नाटकचे माजी राज्यपाल आणि माजी कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  कार्डिएक अरेस्टमुळे हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं असून, आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर दिल्लीतल्या निगम बोध घाटावर विधी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नवी दिल्लीः कर्नाटकचे माजी राज्यपाल आणि माजी कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कार्डिएक अरेस्टमुळे हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं असून, आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर दिल्लीतल्या निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.हंसराज भारद्वाज यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं. पीएमओनं ट्विट करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांच्या निधनामुळे मी दुःखी आहे. दुःखाच्या या क्षणात मी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत आहे. तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 19 मे 1937ला हरियाणात जन्मलेल्या हंसराज भारद्वाज यूपीएच्या कार्यकाळात अनेक वर्षं कायदा मंत्री होते. हंसराज भारद्वाज यांनी 22 मे 2004 ते 28 मे 2009पर्यंत कायदामंत्रिपद सांभाळलं होतं. तसेच भारद्वाज यांनी स्वातंत्र्यानंतर जास्त काळ कायदामंत्रिपद भूषवलेलं आहे. हंसराज यांनी कायदामंत्रिपदानंतर राज्यपाल म्हणून सेवा दिली आहे. भारद्वाज यांनी कर्नाटक आणि केरळचं राज्यपालपद भूषवलेलं आहे. भारद्वाज 2009 ते 2014पर्यंत कर्नाटकचे राज्यपाल होते. तसेच 2012-13पर्यंत ते केरळचेही राज्यपाल होते. त्याशिवाय हंसराज भारद्वाज 1982, 1994, 2000 आणि 2006 राज्यसभेचे सदस्यसुद्धा राहिले आहेत. तसेच काँग्रेस नेते हंसराज भारद्वाज हे सर्वोच्च न्यायालयातील नावाजलेले वकीलसुद्धा होते. 

टॅग्स :congressकाँग्रेस