माजी केंद्रीय मंत्री जी.के वासन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

By Admin | Updated: November 3, 2014 13:47 IST2014-11-03T13:47:55+5:302014-11-03T13:47:55+5:30

तामिळनाडूतील काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री जीके वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

Former union minister GK Vasan's departure from Congress | माजी केंद्रीय मंत्री जी.के वासन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

माजी केंद्रीय मंत्री जी.के वासन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. ३ - तामिळनाडूतील काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री जी.के वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. वासन यांनी पक्ष सोडल्याने तामिळनाडूमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वासन हे तामिळनाडूतील दिवंगत काँग्रेस नेते जी.के. मोपनार यांचे पुत्र आहे. 
तामिळनाडूच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विरोधीगटातील नेत्याची निवड झाल्यापासून जी.के वासन पक्षावर नाराज होते. काँग्रेसने पक्ष कार्यकर्ते आणि तामिळनाडूतील जनतेच्या भावनांचा आदर केला नाही अशी टीका करत वासन यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तामिळनाडूतील युवा पिढीला आता नवीन राजकीय पर्याय हवा असून आम्ही नवीन पक्ष स्थापन करु अशी घोषणाही त्यांनी केली. पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडा याविषयी लवकरच माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले. 
जीके वासन हे तामिळनाडूतील ज्येष्ठ काँग्रेस नेते जी.के. मोपनार यांचे पुत्र आहेत. मोपनार यांनीही कालांतराने काँग्रेसमधून बाहेर पडत 'तामिळ मनिला काँग्रेस' या पक्षाची स्थापना केली होती. मात्र मोपनार यांच्या निधनानंतर वासन यांनी टीएमकेला काँग्रेसमध्ये विलीन केले होते.  

Web Title: Former union minister GK Vasan's departure from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.