सपाचे माजी नेते अमर सिंह रुग्णालयात
By Admin | Updated: December 14, 2015 12:40 IST2015-12-14T12:40:23+5:302015-12-14T12:40:23+5:30
काहीवर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सपाचे माजी नेते अमर सिंह रुग्णालयात
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - काहीवर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरसिंह यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांना दिल्लीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टर ५९ वर्षीय अमरसिंह यांच्या विविध चाचण्या करत आहेत. राज्यसभेचे माजी खासदार असणारे अमर सिंह यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. २०१० साली समाजवादी पार्टीने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून ते बाजूला फेकले गेले.
प्रयत्न करुनही पुन्हा त्यांना राजकारणात ते स्थान मिळवता आले नाही. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्याशी त्यांचे आजही चांगले संबंध असून, ते समाजवादी पार्टीत परतणार असल्याची चर्चा सुरु असते.