शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

माजी शिवसैनिकाला मिळणार उपराष्ट्रपती पदाची संधी?; मोदी-शाह यांची नवी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 9:51 AM

प्रभू यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. गुरुवारी रात्री घेतलेल्या या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - येत्या १८ जुलै रोजी देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी संयुक्त उमेदवार म्हणून उभं केले आहे. राष्ट्रपतीपदानंतर लगेच उपराष्ट्रपतीपदासाठीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कुणाला उभं करणार याबाबत विविध नावं पुढे येत आहेत. 

महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपाला यश आले आहे. भाजपाने १०६ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आणखी एक खेळी होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी शिवसैनिकालाच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची बातमी आहे. 

माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले आहे. प्रभू यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. गुरुवारी रात्री घेतलेल्या या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. अमित शाह आणि सुरेश प्रभू यांच्यात चर्चा झाली असून उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव पुढे येऊ शकते अशी शक्यता दिल्लीच्या वर्तुळात बोलली जात आहे. 

४ महिन्यापूर्वी सक्रीय राजकारणातून घेतला सन्यासपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं होते. यापुढे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही. आता फक्त पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा आहे असं सुरेश प्रभू यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होते. 

कोण आहेत सुरेश प्रभू?सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात रेल्वे, वाणिज्य अशी दमदार खाती सांभाळली होती. प्रभू पेशाने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आहेत. ते मूळचे शिवसेनेचे नेते, पण मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अगदी ऐन वेळी त्यांना भारतीय जनता पक्षात सामावून घेण्यात आले होते. प्रभू अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. त्यावेळी नद्या जोड प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळेच त्यांना मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. १९९६ मध्ये सुरेश प्रभू यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. १९९८, १९९९ लोकसभेतही त्यांनी विजय मिळवला होता. १९९८ ते २०१४ काळात ते केंद्रात मंत्री होते. २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा सिंधुदुर्ग मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये सुरेश प्रभूऐवजी विनायक राऊत यांना शिवसेनेने तिकीट दिले. तेव्हापासून ते शिवसेनेच्या संघटनात्मक राजकारणापासून दूर गेले. हीच संधी साधत भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारीही सोपवली

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSuresh Prabhuसुरेश प्रभूAmit Shahअमित शाह