शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 16:47 IST

CoronaVirus: माजी गव्हर्नरांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे.

ठळक मुद्देभारतात इतकी वाईट परिस्थिती ओढवली नसतीसरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनलीकोरोनाची दुसरी लाट आणखी घातक - राजन

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर माजी गव्हर्नरांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे. कोरोनाबाबतीत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा केंद्र सरकारला नडला, असा घणाघात करण्यात आला आहे. (former rbi governor raghuram rajan criticized central govt over corona situation in country)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. मात्र, दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला आहे. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे कोरोच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठे नुकसान केले, अशी कठोर टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.

तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही; दिल्ली हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे

भारतात इतकी वाईट परिस्थिती ओढवली नसती

सरकारमधील कोणी जगाकडे लक्ष दिले असते, इतरत्र कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले असते, तर कदाचित भारतात वाईट स्थिती ओढवली नसती, असेही राजन यांनी म्हटले आहे.  ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी सज्ज रहाणे आवश्यक होते, असा सल्ला राजन यांनी दिला आहे. 

“गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधी शुद्ध राहत नाही”; न्यायालयाने सुजय विखेंना सुनावले

सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली

पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला.गेल्या वर्षी पाहिल्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या एका लाखांवर गेली नव्हती. मात्र यावेळी त्यात तीनपटीने वाढ झाली आहे. तसेच देशात लसीकरण मोहिमेतील गोंधळ कोरोनाची साथ वाढण्यास कारणीभूत असल्याचा आरोप राजन यांनी केला आहे. 

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

कोरोनाची दुसरी लाट आणखी घातक

कोरोनाची दुसरी लाट आणखी घातक बनली असून, केंद्रातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी भारताने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली, भारताने कोरोनाला पराभूत केले, अशा प्रकारच्या घोषणा यापूर्वीच केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात मार्च आणि एप्रिल महिन्यात करोनाने पुन्हा शिरकाव केला, असेही राजन यांनी सांगितले. 

संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस

दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकRaghuram Rajanरघुराम राजन