शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 21:31 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देकोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद त्यात सहभागी होणार नाहीत.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि UPAच्या प्रमुख सोनिया गांधींना या डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डिनरचं आयोजन केलं आहे. परंतु राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद त्यात सहभागी होणार नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि UPAच्या प्रमुख सोनिया गांधींना या डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद नाराज आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन यांनीसुद्धा यावर आक्षेप नोंदवला आहे. विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्याची एक परंपरा आहे, परंतु त्यापासून फारकत घेतली जात आहे.  गुलाम नबी आझाद यांचासुद्धा नकारकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीसुद्धा डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्यांना राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु त्यांनी डिनरमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधींना निमंत्रण दिलेलं नसल्यानं अशा कार्यक्रमात आम्ही सहभागी होणं योग्य नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षांचे उपनेते आनंद शर्मांनी मोटेरा स्टेडियममध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना न बोलवण्यावरही टीका केली आहे. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पRamnath Kovindरामनाथ कोविंद