शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जे बोलायचंय ते संघाच्या कार्यक्रमातच बोलेन; प्रणव मुखर्जींनी मौन सौडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 17:50 IST

संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर प्रणव मुखर्जीं पहिल्यांदाच बोलले

कोलकाता : आरएसएसच्या नागपुरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातील सहभागाबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पहिल्यांदा भाष्य केलं. याबद्दल होत असलेल्या चर्चांना नागपुरात संघाच्या कार्यक्रमातच उत्तर देऊ, असं मुखर्जींनी म्हटलं आहे. 'मला जे काही बोलायचं आहे, ते मी नागपुरात बोलेन,' असं मुखर्जी यांनी बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. मला अनेकांनी पत्रं पाठवली आहेत. अनेकांचे फोन आले आहेत. मात्र मी कोणालाही उत्तर दिलेलं नाही, असंही ते म्हणाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि सी. के. जाफर शरीफ यांनी प्रणव मुखर्जींना पत्र लिहून कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. 'मुखर्जी यांच्यासारख्या विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या व्यक्तीनं संघासोबत कोणतीही जवळीक ठेऊ नये,' अशा आशयाचं पत्र मुखर्जी यांना लिहिल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास देशातील धर्मनिरपेक्ष वातावरणावर चुकीचा परिणाम होईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. आनंद बाजार पत्रिकेशी बोलताना जयराम रमेश यांनी काही प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. 'अचानक असं काय झालं की प्रणव मुखर्जी यांच्यासारखा महान नेता, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, ते संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत?' असा सवाल रमेश यांनी केला. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. 'आता त्यांनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं असल्यानं याबद्दल वाद घालून काही होणार नाही. निमंत्रण स्वीकारलचं आहे, तर आता त्यांनी तिथे जावं आणि संघाच्या विचारधारेतील त्रुटी सांगाव्यात,' असं चिदंबरम म्हणाले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघ मुख्यालयात होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयcongressकाँग्रेस