शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रपती कोविंद स्वखर्चाने साजरे करीत धार्मिक सण-­उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 09:46 IST

वाद आणि प्रसिद्धीपासून राहिले दूर

शरद गुप्तानवी दिल्ली : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ काटकसर आणि सेवेसाठी ओळखला जाईल. पूर्ण कार्यकाळात ते वाद आणि प्रसिद्धीपासून दूर राहिले. ते सर्व सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम स्वखर्चाने कुटुंबीयांसमवेत साजरे करायचे. यावर सरकारी पैसे खर्च करू नये, अशी त्यांची धारणा होती. राष्ट्रपती भवन परिसरातील मंदिर, गुरुद्वारा, चर्च आणि मशिदीच्या परिसरातच ते सर्व धार्मिक कार्यक्रम साजरे करायचे. त्यासाठी कोविंद यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गणी द्यायचे. यापूर्वीही सर्व राष्ट्रपती धार्मिक सण सामूहिकपणे साजरे करीत आणि त्याचा खर्च राष्ट्रपती भवन करीत होते.

लिमोझीन खरेदीचा प्रस्ताव स्थगितकोरोनामुळे त्यांनी काटकसर म्हणून पारंपरिक समारोहादरम्यान वापरण्यासाठी लिमोझीन कार खरेदीचा प्रस्तावही स्थगित केला. राष्ट्रपती भवनात आयोजित सर्व कार्यक्रमांवरील खर्च ते स्वत: पाहत.

पत्नी सविता यांनी मास्क बनविले कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान कोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गरिबांसाठी भोजनाची व्यवस्था केली, मास्क तयार केले. त्यांनी एक महिन्याचे वेतन पीएम केअर्स फंडला दान केले होते. एक वर्षांपर्यंत ३० टक्के वेतन या फंडसाठी दान केले होते. त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी स्वत: शिलाई यंत्रावर शेकडो मास्क तयार करून गरिबांना मोफत वाटले, तर कुटुंबातील अन्य सदस्यांनी दररोज किमान शंभर लोकांसाठी स्वत: भोजन तयार करून गुरुद्वारा रकाबगंजमार्फत गरिबांना वाटप केले होते.

कुलगुरूंशी सातत्याने संवाद; मीडियापासून अंतर राखलेकुलपती म्हणून सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत त्यांचे बैठकांचे सत्र सुरू केले होते. यात ते कुलगुरूंशी संसाधनाच्या अभावापासून शैक्षणिक दर्जासह सर्व विषयांवर चर्चा करायचे व अभिप्राय केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पाठवायचे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या ६ महिने अगोदर त्यांनी मीडियापासून अंतर राखले होते. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्ष