व्यापमंच्या वादग्रस्त माजी अध्यक्षाची फोनवरून नियुक्ती

By Admin | Updated: July 16, 2015 04:38 IST2015-07-16T04:38:36+5:302015-07-16T04:38:36+5:30

सध्या देशभर गाजत असलेला मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळातील घोटाळा (व्यापमं घोटाळा) उघड होऊन त्याचा तपास सुरु झालेला असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

Former President of Businessman's Appointment on the Phone | व्यापमंच्या वादग्रस्त माजी अध्यक्षाची फोनवरून नियुक्ती

व्यापमंच्या वादग्रस्त माजी अध्यक्षाची फोनवरून नियुक्ती

भोपाळ: सध्या देशभर गाजत असलेला मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळातील घोटाळा (व्यापमं घोटाळा) उघड होऊन त्याचा तपास सुरु झालेला असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या मंडळाच्या वादग्रस्त माजी अध्यक्षांची परदेशातून फोन करून राज्य वित्त आयोगावर सदस्य म्हणून घाईगर्दीने नेमणूक केल्याचे आरटीआयद्वारे उघड झाले.
या घोटाळ््याचा पर्दाफाश करणारे ‘व्हिसलब्लोअर’ अजय दुबे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज करून मिळविलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात गुंतवणूक आणण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री चौहान यांनी तेथून फोन करून व्यापमंचे माजी अध्यक्ष मलय राय यांना राज्य वित्त आयोगावर सदस्य म्हणून नेमण्याचे आदेश दिले.
मलय राय हे सन २००९-१० या काळात व्यापमंचे अध्यक्ष होते व घोटाळ््याच्या तपासात त्यांना अद्याप ‘क्लीन चिट’ मिळालेली नाही. व्यापमं घोटाळा २०१३ मध्ये सर्वप्रथम उघड होऊन त्याचा तपासही सुरु झाला होता. मुख्यमंत्री चौहान यांनी ६ जून २०१४ रोजी दक्षिण आफ्रिकेतून फोन करून मलय राय यांना वित्त आयोगावर नेमण्याचे तोंडी आदेश दिले व परत आल्यावर नंतर औपचारिक नियुक्ती आदेशावर स्वाक्षरी केली, असे दुबे यांनी मिळविलेल्या माहितीवरून दिसते. एवढ्या घाईघाईने नेमणूक करण्याचे काय कारण होते? की मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव होता?

Web Title: Former President of Businessman's Appointment on the Phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.