शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो- डॉ. मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 08:35 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलामी असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो.मी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी कायम संवाद साधत आलो आहे.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मी असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी कायम संवाद साधत आलो आहे. मी परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर नेहमीच पत्रकार परिषद घेत होतो, असंही मनमोहन सिंग म्हणाले आहेत.मी फक्त एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर नव्हतो, तर देशाचा एक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टरही होतो.  ‘चेंजिंग इंडिया’या कार्यक्रमात सहभागी होत मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. केंद्र सरकार आणि आरबीआयचा संबंध हा पती-पत्नीसारखा आहे. दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ बसेल अशा पद्धतीनं विचारांचं समाधान शोधलं पाहिजे. विशेष म्हणजे केंद्राचा आरबीआयच्या पैशावर डोळा असतानाच मनमोहन सिंग यांनी हे विधान केलं आहे. तसेच केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये झालेल्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनीही गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आरबीआयचं गव्हर्नरपदही भूषवलं होतं. मनमोहन सिंग म्हणाले, आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे. तसेच केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये पती-पत्नीसारखं नातं पाहिजे. मतभेद असू शकतात, परंतु त्याचं समाधान दोन्ही संस्थांनी सामंजस्यपद्धतीनं शोधलं पाहिजे. तसेच शक्तिकांत दास यांनाही आरबीआय गव्हर्नरपदाचा मनमोहन सिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी