शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:39 IST

Former Pakistani MP Selling Kulfi In Haryana: या खासदाराची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Former Pakistani MP Selling Kulfi In Haryana: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे व्हिसावर भारतात आलेले शेकडो/हजारो पाकिस्तानी आपल्या देशात परतले. पण, अजूनही बरेच भारतात बरेच पाकिस्तानी राहतात, ज्यांची परत तिकडे जाण्याची इच्छा नाही. अशाच लोकांमध्ये दबाया राम नावाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. दबाया राम यांची कहाणी अतिशय वेगळी आहे. दबाया राम एकेकाळी पाकिस्तानात खासदार होते, पण आजकाल ते भारतात कुल्फी विकून उदरनिर्वाह करत आहेत. 

बेनझीर मुत्तो यांच्या सरकारमधील खासदारपाकिस्तानचे माजी खासदार दबाया राम आता भारतातील हरियाणामध्ये कुल्फी आणि आईस्क्रीम विकून उदरनिर्वाह करत आहेत. पण, दबाया राम पाकिस्तानमधील बेनझीर भुट्टो यांच्या सरकारमध्ये खासदार होते. सन 2000 मध्ये आपल्या कुटुंबासह एका महिन्यांच्या व्हिसावर भारतात आले अन् तेव्हापासून भारतातच राहतात. गेल्या 25 वर्षांपासून ते भारतीय नागरिकत्व मिळण्याची वाट पाहत आहेत. 

पाकिस्तान ते भारत...डबाया राम सांगतात की, पाकिस्तानमध्ये हिंदूंची स्थिती खूप वाईट होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबासह भारतात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ते एका महिन्याच्या व्हिसावर भारतात आले होता. कालांतराने त्यांनी व्हिसा आधी एक वर्षासाठी आणि नंतर पाच वर्षांसाठी वाढवला. आता त्यांच्या कुटुंबात 34 सदस्य असून, त्यापैकी सहा जणांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे, तर उर्वरित 28 जणांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. 

पाकिस्तानमध्ये 25 एकर जमीन डबाया राम यांनी सांगितले की, त्यांच्या आजोबांच्या नावावर अजूनही पाकिस्तानात 25 एकर जमीन आहे. त्यांची जमीन पाकिस्तानातील बकर जिल्ह्यातील दरियापूर तहसीलमधील पंचगिरेह भागात आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दबाया राम यांची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, दबाया राम आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी असे म्हटले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानMember of parliamentखासदारIndiaभारत