शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

हार्वर्ड विद्यापीठाच्या ऑफरच्या नावाखाली NDTVच्या माजी पत्रकार निधी राजदान यांची फसवणूक 

By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 8:15 PM

हार्वर्ड विद्यापीठाची ऑफर आल्यानं राजदान यांनी गेल्या वर्षी दिला नोकरीचा राजीनामा

नवी दिल्ली: हार्वर्ड विद्यापीठातील नोकरीच्या नावाखाली एनडीटीव्हीच्या माजी पत्रकार निधी राजदान यांची फसवणूक झाली आहे. निधी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. मी एका मोठ्या फिशिंग हल्ल्याची बळी ठरले आहे, असं निधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगताना यावर मी पुढे कधीही बोलणार नाही, असंदेखील निधी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.हार्वर्ड विद्यापीठात एसोसिएट प्रोफेसर म्हणून संधी मिळत असल्यानं निधी राजदान यांनी जून २०२० मध्ये एनडीटीव्हीमधील नोकरीचा राजीनामा दिला. त्या २१ वर्षे एनडीटीव्हीमध्ये कार्यरत होत्या. निधी राजदान यांनी फसवणुकीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 'सप्टेंबर २०२० मध्ये हार्वर्डमधील अध्यापनकार्य सुरू होईल, असं मला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनामुळे जानेवारी २०२१ पासून वर्ग सुरू होतील, असं सांगितलं गेलं,' अशी माहिती राजदान यांनी दिली आहे. मला येणाऱ्या मेलमध्ये अनेकदा प्रशासकीय विसंगती आढळून आल्या. कोरोना महामारीचा कहर सुरू असल्यानं मी आधी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर मला विविध प्रकारच्या त्रुटी आढळून येऊ लागले. अनेक आक्षेपार्ह बाबी सापडल्या. त्यानंतर मी ही बाब हार्वर्ड विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेली माहिती मी त्यांच्यासोबत शेअर केली, असं निधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हार्वर्डच्या अधिकाऱ्यांनी मला आलेले सर्व मेल तपासले. एका पद्धतशीरपणे करण्यात आलेल्या फिशिंग हल्ल्याचा मी बळी ठरल्याचं त्यातून मला समजलं. प्रत्यक्षात मला हार्वर्डकडून एसोशिएट प्रोफेसरपदाची ऑफर देण्यातच आली नव्हती. माझा वैयक्तिक डेटा, डिव्हाईस आणि सोशल मीडिया अकाऊंटचा आधार घेऊन अतिशय पद्धतशीरपणे माझी फसवणूक केली गेली, अशा शब्दांत निधी यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियातून सांगितला आहे.