शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अपहरण आणि खंडणी प्रकरणात माजी खासदार धनंजय सिंह दोषी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 19:14 IST

Dhananjay Singh : बुधवारी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. सध्या धनंजय सिंह यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.     

जौनपूर : अपहरण आणि खंडणी प्रकरणी माजी खासदार धनंजय सिंह आणि त्यांचा सहकारी संतोष विक्रम यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश शरद त्रिपाठी यांनी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांना दोषी ठरवले. दरम्यान, बुधवारी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. सध्या धनंजय सिंह यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.     

मुझफ्फरनगरचे रहिवासी नमामी गंगेचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांनी १० मे २०२० रोजी लाइन बाजार पोलिस ठाण्यात धनंजय सिंह आणि त्यांचा साथीदार संतोष विक्रम यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. संतोष विक्रम याने दोन साथीदारांसह फिर्यादीचे अपहरण करून माजी खासदार धनंजय सिंह यांच्या निवासस्थानी नेले. 

यानंतर धनंजय सिंह यांनी पिस्तुलचा धाक दाखवून शिवीगाळ केली आणि फिर्यादीवर हलक्या दर्जाचे साहित्य पुरवण्यासाठी दबाव टाकला. तसेच, फिर्यादीने नकार दिल्याने धनंजय सिंह यांनी त्याला धमकावून खंडणी मागितली. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी धनंजय सिंह यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आज न्यायालयाने धनंजय सिंह यांना दोषी ठरवून तुरुंगात रवानगी केली.

दरम्यान, धनंजय सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही सुरु केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे याची पुष्टी केली. भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर धनंजय सिंह यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. कारण, भाजपाने जौनपूर लोकसभा मतदारसंघातून कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर धनंजय सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:चे एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "मित्रांनो! तयार राहा... लक्ष्य फक्त एक लोकसभा ७३, जौनपूर आहे. यासोबतच त्यांनी 'जीतेगा जौनपूर-जीतेंगे हम' अशा मजकुरासह आपला फोटोही शेअर केला होता. 

२७ व्या वर्षी पहिल्यांदा बनले आमदारवयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी धनंजय सिंह यांनी २००२ ची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. यामध्ये विजय मिळवून विधानसभेत पोहोचलेले धनंजय सिंह २००७ मध्ये जनता दल युनायटेड (JDU) च्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. २००९ ची लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली. संसदेत जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. धनंजय सिंह यांनी २०२२ च्या यूपी निवडणुकीत जेडीयूच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालयMember of parliamentखासदार