राहुल गांधींसाठी माजी मंत्र्याच्या हाती चपला

By Admin | Updated: December 9, 2015 23:21 IST2015-12-09T23:21:34+5:302015-12-09T23:21:34+5:30

तामिळनाडूतील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यास आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी हे आपल्या हाताने चपला घालून देतानाचा

Former minister for Rahul Gandhi | राहुल गांधींसाठी माजी मंत्र्याच्या हाती चपला

राहुल गांधींसाठी माजी मंत्र्याच्या हाती चपला

चेन्नई : तामिळनाडूतील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यास आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी हे आपल्या हाताने चपला घालून देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
संपुआ सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री राहिलेले नारायणसामी यांनी सुद्धा एका वृत्तवाहिनीशी बोलताना याची कबुली दिली आहे.
राहुल गांधी मंगळवारी पुडुचेरी आणि तामिळनाडूत पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
यावेळी काँग्रेसचे काही नेतेही त्यांच्यासमवेत होते. एका ठिकाणी पाणी आणि चिखल साचला होता. तेव्हा नारायणसामी यांनी आपल्या पायातील चपला काढून राहुल यांच्या पायात घातल्या.
राहुल गांधी आमचे नेते
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सामी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राहुल गांधी आपल्या पायातील जोडे काढून अनवाणी पायी निघाले होते. ते आमचे नेते आहेत. त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी त्यांना चप्पल घालून देत असेल तर त्यात कुणाला त्रास होण्याचे काही कारण नाही, असे सामी यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Former minister for Rahul Gandhi